ललीत मोदी भारतात परतणार?

Last Updated: Wednesday, August 27, 2014 - 22:05
ललीत मोदी भारतात परतणार?

दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने इंडियन प्रीमियर लीगचे माजी आयुक्त ललीत मोदी यांना पासपोर्ट परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हायकोर्टाच्या या आदेशानंतर ललीत मोदी भारतात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार दिल्ली हायकोर्टाने पासपोर्ट बहाल करतांना म्हटलंय, ललीत मोदी यांच्याविरोधात फेमाने कोणतंही मत मांडलेलं नाही. हायकोर्टाच्या या आदेशानंतर ललीत मोदी भारतात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ललीत मोदी इंग्लडला राहतात, या आधी 16 जानेवारी रोजी हायकोर्टाच्या एक सदस्यीय खंडपिठाने, ललीत मोदी यांचा पासपोर्ट बहाल करण्यास नकार दिला होता. ललीत मोदी यांची राजस्थान क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने त्यांच्यावर बंदी कायम ठेवलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 First Published: Wednesday, August 27, 2014 - 22:05


comments powered by Disqus