भारत vs बांग्लादेश पहिली कसोटी, टॉस जिंकून भारताचा बॅटिंगचा निर्णय

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं टॉस जिंकून पहिल्यांगा बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आक्रमक विराट कोलहीच्या कॅप्टन्सीची टेस्ट असणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या उपस्थित कोहलीला टीमच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार आहे.

PTI | Updated: Jun 10, 2015, 09:37 AM IST
भारत vs बांग्लादेश पहिली कसोटी, टॉस जिंकून भारताचा बॅटिंगचा निर्णय  title=

ढाका : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं टॉस जिंकून पहिल्यांगा बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आक्रमक विराट कोलहीच्या कॅप्टन्सीची टेस्ट असणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या उपस्थित कोहलीला टीमच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार आहे.

धोनीनं टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटकडे टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा काटेरी मुकुट घालण्यात आलाय. बांग्लादेशमध्ये भारतानं एकणू सात टेस्ट खेळल्यात यामध्ये सहामध्ये विजय आणि एक टेस्ट ड्रॉ करण्यात भारताला यश मिळालंय. 2010 नंतर भारत पहिल्यांदा बांग्लादेशमध्ये टेस्ट खेळतेय.

बांग्लादेशकडून टीम इंडिया पराभूत झाली तर त्यांना रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर समाधान मानाव लागेल. टेस्ट ड्रॉ झाल्यास फारस फरक पडणार नाही. मॅच जिंकल्यावर भारताच्या रँकिंगमध्ये कुठलाही बदल होणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.