द्रविडला जमला नाही तो रेकॉर्ड राहुलनं केला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकून चर्चेत आलेला कर्नाटकचा बॅट्समन लोकेश राहुलनं रणजी क्रिकेटच्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध एक नवा रेकॉर्ड बनवलाय. घरगुती मॅचमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या राहुलनं आपल्या टीमसाठी पहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकलीय. 

Updated: Jan 31, 2015, 04:01 PM IST
द्रविडला जमला नाही तो रेकॉर्ड राहुलनं केला title=

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकून चर्चेत आलेला कर्नाटकचा बॅट्समन लोकेश राहुलनं रणजी क्रिकेटच्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध एक नवा रेकॉर्ड बनवलाय. घरगुती मॅचमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या राहुलनं आपल्या टीमसाठी पहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकलीय. 

हा एक असा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत कर्नाटकच्या एकाही बॅट्समनला जमला नाही. एवढंच नव्हे तर टीम इंडियाचा आधार 'द वॉल' राहुल द्रविड सुद्धा हा रेकॉर्ड बनवू शकला नव्हता.

दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुलनं ४२२ बॉल्समध्ये ३१७ रन्सवर नॉटआऊट होता. आपल्या या मोठ्या स्कोअरमध्ये राहुलने ४५ चौकार आणि ३ जबरदस्त सिक्सर मारले. कर्नाटकसाठी यापूर्वी इतके जास्त रन्स बनविण्याचा रेकॉर्ड बॅरिंग्टन रोलान्ड यांच्या नावावर होता. त्यांनी २८३ रन्स केले होते.

या शानदार रेकॉर्डनंतर राहुलजवळ एक आणि रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. राहुल जर उद्याच्या खेळात आपल्या स्कोअरमध्ये १० रन्स अधिक जोडेल तर तो उत्तर प्रदेश विरुद्ध सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरेल. रणजी मॅचमध्ये युपी विरुद्ध सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन केदार जाधव आहे. त्यानं ३२७ रन्स केले होते. 

राहुलच्या या शानदार खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्नाटकने ६ विकेटवर ६३३ रन्स केले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.