रणजीमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगले-अंकित बावनेचा विक्रम

महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगले आणि अंकित बावनेनं रणजी क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे.

Updated: Oct 14, 2016, 04:56 PM IST
रणजीमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगले-अंकित बावनेचा विक्रम title=

मुंबई : महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगले आणि अंकित बावनेनं रणजी क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे. अंकित आणि स्वप्नीलनं दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये 594 रनची नाबाद पार्टनरशीप केली. पण महाराष्ट्रानं 635/2 वर डाव घोषित केल्यामुळे या दोघांना विश्वविक्रम करता आला नाही. डाव घोषित झाला तेव्हा स्वप्निल गुगले नाबाद 351 रनवर तर अंकित बावने नाबाद 258 रनवर होते.

श्रीलंकेचा महिला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांच्यामध्ये 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये झालेली 624 रनची पार्टनरशीप हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. स्वप्निल आणि अंकितची ही पार्टनरशीप क्रिकेटच्या इतिहासातली दुसरी मोठी पार्टनरशीप आहे. तर रणजीमधली ही सर्वात मोठी पार्टनरशीप ठरली आहे.