महेंद्र सिंग धोनीला मिळालं बर्थडे गिफ्ट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला आपल्या बर्थडेचं गिफ्ट मिळालंय. नव्यानंच लॉन्च क्रिकेट वेबसाईटची जाहिरात धोनी करणार आहे.क्रिकेट चाहत्यांसाठी नव्यानं www.drcricket7.com लाँच करण्यात आलीय. 

Updated: Jul 8, 2014, 06:23 PM IST
महेंद्र सिंग धोनीला मिळालं बर्थडे गिफ्ट  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला आपल्या बर्थडेचं गिफ्ट मिळालंय. नव्यानंच लॉन्च क्रिकेट वेबसाईटची जाहिरात धोनी करणार आहे.क्रिकेट चाहत्यांसाठी नव्यानं www.drcricket7.com लाँच करण्यात आलीय. 

रिती स्पोर्टसनं या क्रिकेटसाठी असलेल्या नव्या वेबसाईटला लॉन्च करण्याची घोषणा केलीय. 
क्रीडा व्यवस्थापकीय कंपनीचे अध्येक्ष अरुण पांडे यांनी सांगितले की, भारतात क्रिकेट प्रेमी किती आहेत हे सर्वांना चांगलंच माहितीये. असेच काही क्रिकेट चाहते त्यांच्या आवडीच्या खेळांडूच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्याच चाहत्यांसाठी हा एक ऑनलाईन मंच असणार आहे. 

ज्यावेळी त्यांचा आवडता खेळाडू खेळत नाही तेव्हा काय करतोय, कोठे असेल ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या मंचामुळं चाहत्यांना मिळणार आहेत. 

पांडे यांनी सांगितले की, काही क्रिकेटरच्या अशा काही मनोरंजक गोष्टी आहेत. त्यानं आम्हांला खूप वर्षांपासून प्रेरित केलंय आणि drcricket7.com याचप्रकारच्या क्रिकेटरच्या गोष्टी घेऊन येणार आहेत, ज्या याआधी कोणीही ऐकल्या नसतील. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.