रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक, मरियप्पन थांगवेलूने रचला इतिहास

रिओ पॅरालिम्पिकमधील दुसऱ्या दिवशी भारताने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत पहिल्या पदकाची कमाई केली. 

Updated: Sep 10, 2016, 10:58 AM IST
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक, मरियप्पन थांगवेलूने रचला इतिहास  title=

रिओ : रिओ पॅरालिम्पिकमधील दुसऱ्या दिवशी भारताने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत पहिल्या पदकाची कमाई केली. 

रिओमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत टी42 उंच उडी प्रकारात भारताच्या मरियप्पन थांगवेलूने सुवर्णपदक पटकावले तर याच प्रकारात वरुण भाटीने कांस्यपदकावर कब्जा केला. 

मरियप्पने 1.89 मीटरची उंच उडी घेत पहिले स्थान पटकावले. अमेरिकेच्या ग्रेव्ही सॅमने 1.86 मीटर अंतर नोंदवत दुसऱे स्थान तर भारताच्या वरुण भाटीला तिसरे स्थान मिळाले. 

दुसरीकडे भालाफेकीत मात्र संदीपचे कांस्यपदक हुकले. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.