तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची पडझड, भारतीय बॉलर्ससमोर टॉप ऑर्डर फ्लॉप

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडची पडझड झाली. पाहुण्यांचा निम्मा संघ दीडशेच्या आत तंबूत परतला. इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय बॉलर्ससमोर अक्षरशः फ्लॉप ठरली.

Updated: Nov 26, 2016, 03:41 PM IST
तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची पडझड, भारतीय बॉलर्ससमोर टॉप ऑर्डर फ्लॉप title=

मोहाली : तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडची पडझड झाली. पाहुण्यांचा निम्मा संघ दीडशेच्या आत तंबूत परतला. इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय बॉलर्ससमोर अक्षरशः फ्लॉप ठरली.

पाहुण्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय बॉलर्सनं इंग्लंडला एका मागो माग एक धक्के दिले..  त्यानंतर जेम्स बॅरिस्टो आणि जोस बटलरनं टीम इंडियाच्या बॉलर्सचा नेटानं मुकाबला संघाची पडझड रोखली.

दोघांनी सहाव्या विकेटीसाठी 69 रन्स जोडल्या. इंग्लंडतर्फे जॉनी बॅरिस्टोनं नेटानं भारतीय बॉलर्सचा मुकाबला करत अर्धशतक झळकावलं. रवींद्र जाडेजानं जोस बटलरला बाद करत आणखी एक धक्का दिला. रवींद्र जाडेजाने 2 तर उमेश यादव, शमी, अश्विन, जयंत यादवनं प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.