मोहम्मद कैफची गुजरात लायन्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड

Last Updated: Friday, February 17, 2017 - 20:40
मोहम्मद कैफची गुजरात लायन्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफची गुजरात लायन्स या आयपीएल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. गुजरात लायन्सचे संचालक केशव बंसल यांनी ही माहिती दिली आहे. रैना, जडेजा आणि ब्राव्हो या टी20मधल्या दिग्गजांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळाल्यामुळे मी खुष आहे असं कैफ म्हणाला आहे.

आयपीएलच्या मागच्या मोसमामध्ये रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लायन्सनं सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. यंदाच्या वर्षी 5 एप्रिलपासून आयपीएलचा दहावा मोसम सुरु होणार आहे. 

First Published: Friday, February 17, 2017 - 20:40
comments powered by Disqus