आयपीएलमुळे रिक्षा चालकाचा मुलगा कोट्याधीश, मोहम्मद सिराजची यशोगाथा

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. 

Updated: Feb 20, 2017, 08:48 PM IST
आयपीएलमुळे रिक्षा चालकाचा मुलगा कोट्याधीश, मोहम्मद सिराजची यशोगाथा  title=

हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावामध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पुण्याच्या टीमनं स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांना विकत घेतलं. पण हैदराबादच्या मोहम्मद सिराजनं मात्र सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं.

मोहम्मद सिराजला सनरायजर्स हैदराबादनं तब्बल 2.6 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. मोहम्मद सिराज हा रिक्षा चालकाचा मुलगा आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचं माझं स्वप्न होतं. रणजी ट्रॉफीमधल्या माझ्या कामगिरीमुळे आयपीएलमध्ये माझी बोली लागली, अशी प्रतिक्रिया मोहम्मद सिराजनं दिली आहे.