विराट कोहलीने लॉन्च केला 'विराट फॅनबॉक्स', चाहते साधू शकतात थेट संवाद

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. तुम्हाला विराटशी संवाद साधण्याची इच्छा असेल तर ती नव्या स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज पूर्ण होऊ शकते. 

Updated: Apr 26, 2016, 08:19 AM IST
विराट कोहलीने लॉन्च केला 'विराट फॅनबॉक्स', चाहते साधू शकतात थेट संवाद title=

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. तुम्हाला विराटशी संवाद साधण्याची इच्छा असेल तर ती नव्या स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज पूर्ण होऊ शकते. 

मोटोराला कंपनीने ‘विराट कोहली एडिशन’चा स्मार्टफोन बाजारात दाखल केलाय. ‘मोटो जी टर्बो- विराट कोहली एडिशन’, असे या स्मार्टफोनचे नाव असून तो बाजारात १६ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये विराट कोहलीशी चॅट करता येईल असे खास अॅप्लिकेशन यात आहे.

 ‘मोटो जी टर्बो’च्या या खास एडिशनचे अनावरण सोमवारी विराट कोहलीच्या उपस्थितीत झाले. यावेळी कोहलीने आपल्या चाहत्यांसोबत गप्पाही मारल्या. ‘मोटो जी टर्बो’सोबत तुम्हाला विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली एक छोटेखानी बॅट देखील दिली जाणार आहे. 

‘स्मार्टफोन’मध्ये ‘विराट कोहली फॅन क्लब अॅप’चे एका वर्षाचे सदस्यत्व देण्यात येईल. त्यानुसार तुम्हाला अॅपमध्ये लॉग इन करून विराटशी संवाद साधता येईल. शिवाय, कोहलीशी संबंधित अपडेट्सही नित्यनेमाने मिळतील.  

विराट म्हणाला, या अॅपमुळे मला माझ्या चाहत्यांच्या आणखी जवळ जाता येईल. चाहत्यांशी चॅटींग करायला, त्यांना भेटायला मला नक्कीच आवडेल. या अॅपच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे.