VIDEO : महेंद्रसिंग धोनी बनला बाहुबली

सध्या चर्चा आहे ती बाहुबली आणि क्रिकेटची. प्रभास स्टारर बाहुबली 2 हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडतोय. नवा इतिहास या सिनेमाने रचलाय. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही बाहुबलीपेक्षा कमी नाहीये.

Updated: May 15, 2017, 07:56 PM IST
VIDEO : महेंद्रसिंग धोनी बनला बाहुबली  title=

मुंबई : सध्या चर्चा आहे ती बाहुबली आणि क्रिकेटची. प्रभास स्टारर बाहुबली 2 हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडतोय. नवा इतिहास या सिनेमाने रचलाय. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही बाहुबलीपेक्षा कमी नाहीये.

विकेटच्या पाठीमागे शांत उभा राहणारा धोनीचा मैदानातील चाणाक्षपणा त्याला इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळे ठरवतो. सध्या सोशल मीडियावर एक स्मॅश व्हिडीओ व्हायरल होतोय. यात धोनीला बाहुबलीच्या रुपात दाखवलंय. या व्हिडीओत बाहुबलीच्या डॉयलॉगचाही वापर करण्यात आलाय. 

हा स्मॅश व्हिडीओ या वर्षी मार्चमध्ये वॉल मास्क या चॅनेलवरुन शेअर करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.