आयसीसी वन डे रँकिंगमध्ये धोनी-कोहलीची उडी

 भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्ल्ड कप ग्रुप मॅच संपल्यानंतर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत वन डेच्या फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी उडी घेऊन आठव्या स्थानावर पोहचला आहे. 

Updated: Apr 2, 2015, 04:38 PM IST
आयसीसी वन डे रँकिंगमध्ये धोनी-कोहलीची उडी title=

मेलबर्न :  भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्ल्ड कप ग्रुप मॅच संपल्यानंतर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत वन डेच्या फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी उडी घेऊन आठव्या स्थानावर पोहचला आहे. 

तर दुसरीकडे विराट कोहली भारताकडून सर्वात वरच्या चौथ्या स्थानावर पोहचला आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलापेक्षा केवळ चार अंकांनी मागे आहे. 

भारताचा सलामीचा डावखुरा फलंदाज शिखर धवन सातव्या स्थानावर पोहचला आहे. सुरेश रैना तीन स्थानांवर उडी मारून १७ व्या स्थानावर पोहचला आहे. रोहित शर्मा मात्र तीन स्थान खाली घसरून १९ व्या स्थानावर पोहचला आहे. 

गोलंदाजीत भारताकडन मोहम्मद शमी ११ व्या स्थानावर आहे. रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजा यांना एका स्थानाचा तोटा झाला आहे. ते क्रमशः १७, १८ आणि १९ व्या स्थानावर आहेत. 

उमेश यादवने आश्चर्यकारक आठ स्थानांची उडी घेतली आहे. ३४ व्या स्थानावर पोहचला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.