महेंद्रसिंग धोनीचा मास्टरस्ट्रोक अंदाज

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रायजिंग पुणे सुपरजायंटचा खेळाडू महेंद्रसिंग धोनीने असे काही केलेय ज्यामुळे प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनातील त्याचे स्थान आणखी उंचावलेय.

Updated: May 4, 2017, 05:46 PM IST
महेंद्रसिंग धोनीचा मास्टरस्ट्रोक अंदाज title=

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रायजिंग पुणे सुपरजायंटचा खेळाडू महेंद्रसिंग धोनीने असे काही केलेय ज्यामुळे प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनातील त्याचे स्थान आणखी उंचावलेय.

केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनी खेळपट्टीवर होता. यावेळी संघाला धावांची गरज होती. मात्र त्यावेळीच धोनी कॅच आऊट झाला. गोलंदाजालाही धोनीच्या बॅटलाही बॉल लागला की नाही हे कळत नव्हते. यावेळी फईल्ड अंपायर हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवतात.

मात्र त्यावेळी अंपायरच्या कोणत्याची निर्णयाची वाट न पाहता तो मैदान सोडून निघाला. धोनीच्या या वागणुकीने त्याने चाहत्यांच्या मनातील आपले स्थान अधिक वाढवले.