धोनीनं जाहीर केलं आपल्या चिमुकलीचं नाव...

भारतीय क्रिकेट कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी धोनी यांनी आपल्या नवजात मुलीच्या नावाच्या रहस्यावरचा पडदा उघडलाय. 

Updated: Feb 10, 2015, 09:13 AM IST
धोनीनं जाहीर केलं आपल्या चिमुकलीचं नाव...  title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी धोनी यांनी आपल्या नवजात मुलीच्या नावाच्या रहस्यावरचा पडदा उघडलाय. 

जगभर पसरलेले धोनीचे फॅन्स त्याच्या लाडक्या चिमुकलीचं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. त्यांची उत्सुकता जास्त ताणून न धरता धोनीनं आपल्या चिमुकलीचं नाव जाहीर केलंय. 

धोनीनं आपल्या चिमुकलीचं नाव 'जीवा' असं ठेवलंय. जीवा हा एक पारसी शब्द आहे. याचा अर्थ आहे सुंदर, चमकदार, कुशाग्र आणि प्रकाश... 

आपल्या चिमुकलीचं नाव साक्षी धोनीनं ट्विट करून जाहीर केलंय. 'या सुंदर जगात तुझं स्वागत आहे जीवा! मम्मा आणि पापा तुझ्यावर खूप प्रेम करतात. शुभेच्छांसाठी आभारी आहे, #बेबी जीवा'!, असं साक्षीनं ट्विट केलंय. 

साक्षी धोनीनं शुक्रवारी गुडगावच्या फोर्टिस हॉस्पीटलमध्ये एक मुलीला जन्म दिला. टीम इंडियानं या आनंदाच्या क्षणी शनिवारी अॅडलेडमध्ये एका पार्टीचंही आयोजन केलं होतं. इथं टीम इंडियाचा खेळाडू रोहित शर्मासहीत सगळ्याच खेळाडुंनी खूप मस्तीही केली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.