मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना होतोय. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यात हा सामना रंगतोय. 

Updated: May 16, 2017, 06:29 PM IST
मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल title=

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना होतोय. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यात हा सामना रंगतोय. 

या सामन्यापूर्वी धोनीचा हा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. धोनीचा सरावादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. यात धोनीने मारलेल्या शॉटनंतर धोनी धोनी असा जयघोष होतोय.

आज मुंबई आणि पुण्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या आयपीएलमध्ये यापूर्वीच्या पुण्याविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला हार पत्करावी लागलीये. त्यामुळे पुणे मुंबईविरुद्ध विजयाची हॅटट्रिक करणार का की मुंबई विजयी डंका वाजवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

DHONI DHONI DHONI Match or no match, @mahi7781 hits them out of the park equally hard! #RangWahiJungNayi #IPL

A post shared by Rising Pune Supergiant (@punesupergiants) on