नितीशा राणा, पोलार्डचा धमाका, मुंबई इंडियन्सचा विजय

मुंबई इंडियन्सच्या नितीश राणा, किरेन पोलार्ड यांनी केलेल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबई गुजरात लायन्सचा ६ विकेट्सनी पराभव केला.

Updated: Apr 16, 2017, 07:53 PM IST
नितीशा राणा, पोलार्डचा धमाका, मुंबई इंडियन्सचा विजय title=

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या नितीश राणा, किरेन पोलार्ड यांनी केलेल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबईने गुजरात लायन्सचा ६ विकेट्सनी पराभव केला.

यंदाच्या आयपीएलमध्ये नितीश राणाने सलग दुसऱ्यांदा हाफसेंच्युरी झळकावली. त्याने ३६ बॉलमध्ये ५३ रन्स केले. किरेन पोलार्डनेही २२ बॉलमध्ये ३९ रन्स तडकावले.

यांच्या खेळीमुळेच मुंबईला गुजरातने विजयासाठी ठेवलेले १७७ धावांचे आव्हान पार करता आले. गुजरातने प्रथम बॅटिंग करताना ४ बाद १७६ रन्स केले होते.