video : एका चेंडूत तीन खेळाडूंना दुखापत

मैदानी खेळ म्हटले की पडझड, दुखापत ही आलीच. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू दुखापत होण्याच्या घटना बऱ्याचदा घडत असतात. व्हिडीओ बातमीच्या खाली पाहा

Updated: Apr 17, 2016, 09:12 AM IST
video : एका चेंडूत तीन खेळाडूंना दुखापत title=

नवी दिल्ली : मैदानी खेळ म्हटले की पडझड, दुखापत ही आलीच. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू दुखापत होण्याच्या घटना बऱ्याचदा घडत असतात. व्हिडीओ बातमीच्या खाली पाहा

मात्र क्रिकेटच्या मैदानावर केवळ एका चेंडूत एक नव्हे दोन नव्हे तर चक्क तीन जणांना दुखापतग्रस्त केल्याचे तुम्ही पाहिलेय का? 

एका हौशी क्रिकेट सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. सुरुवातीला चेंडू स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाला लागला त्यानंतर त्याने लगावलेला चेंडू दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या फलंदाजाच्या पायाला लागला. हे इतक्यावरच थांबले नाही तर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजही या चेंडूने दुखापतग्रस्त झाला.