व्हिडिओ : स्टंपवर ग्लास, ग्लासावर कॉईन... आणि मुरलीचा हिट शॉट!

श्रीलंकेचा जादूगार स्पिनर मुथय्या मुरलीधरन आणि ग्रॅहम स्वान यांचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय. 

Updated: Dec 15, 2015, 06:02 PM IST

 

मुंबई : श्रीलंकेचा जादूगार स्पिनर मुथय्या मुरलीधरन आणि ग्रॅहम स्वान यांचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय. 

मुरलीचा रेकॉर्डच त्याच्या खेळाविषयी सर्व काही सांगून टाकतो. १३३ टेस्ट मॅचमध्ये ८०० आणि ३५० वनडे मध्ये ५३४ विकेट त्यानं घेतल्यात. ४३ वर्षांच्या आपल्या करिअरमध्ये मुरलीनं तब्बल ३५०० विकेटस घेतल्यात. 

या व्हिडिओत मुरलीधरनचा एक खास अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक स्टंपवर ग्लास ठेऊन त्यवर एक कॉईन ठेवण्यात आलाय... आणि आपल्या अनोख्या बॉलिंगनं मुरली ग्लासला धक्काही न लावता केवळ कॉईन पाडताना दिसतोय.