नरसिंगला अश्रू अनावर, कुटुंबानं पंतप्रधानांकडे मागितली मदत

नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं आहे. नरसिंगवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

Updated: Aug 19, 2016, 12:18 PM IST
नरसिंगला अश्रू अनावर, कुटुंबानं पंतप्रधानांकडे मागितली मदत  title=

मुंबई : नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं आहे. नरसिंगवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. CAS अर्थातच कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सनं नरसिंगवर ही कारावाई केली आहे. 

नरसिंगकडे आपल्याला डोपिंगमध्ये अडकवण्यात आल्याचे कुठलेही पुरावे नव्हते. त्यामुळेच CAS नं त्याच्यावर बंदी घातली. नरसिंग यादव 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधीत्व करणार होता. मात्र, आता त्याला बंदी घातल्यानं भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही. 

या निर्णयामुळे नरसिंग अजूनही धक्क्यात आहे. नरसिंग अजूनही कोणाशी बोलत नाही आणि तो रडत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय कुस्ती महासंघाकडून देण्यात आली आहे. 

नरसिंग यादवच्या कुटुंबानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे. आम्हाला पाठिंबा द्या आणि नरसिंगवर घालण्यात आलेली बंदी उठवा, अशी मागणी नरसिंगच्या बहिणीनं मोदींकडे केली आहे. तर माझ्या मुलाविरुद्ध कट करण्यात आल्याची प्रतिक्रिया नरसिंगच्या आईनं दिली आहे.