IPL मध्ये नाही मिळाला खरेदीदार, पण २९ चेंडूत ठोकले शतक

आयपीएलमध्ये या खेळाडूला कोणी खरेदीदार नाही मिळाला पण या खेळाडूने आपल्या कौशल्याच्या जोरावर २९ चेंडूत शानदार शतक लगावून सर्वांना दाखवून दिले. या उद्यन्मुख खेळाडूचे नाव आहे नील नार्वेकर. 

Updated: Nov 25, 2014, 08:15 PM IST
IPL मध्ये नाही मिळाला खरेदीदार, पण २९ चेंडूत ठोकले शतक  title=

मुंबई : आयपीएलमध्ये या खेळाडूला कोणी खरेदीदार नाही मिळाला पण या खेळाडूने आपल्या कौशल्याच्या जोरावर २९ चेंडूत शानदार शतक लगावून सर्वांना दाखवून दिले. या उद्यन्मुख खेळाडूचे नाव आहे नील नार्वेकर. 

नील नार्वेकर हा पार्कोफीन क्रिकेटर्स टीमकडून खेळतो. नीलने रविवारी पार्कोफीन क्रिकेट टीमकडून खेळतांनना मुंबईच्या प्रसिद्ध कांगा क्रिकेट लीग ‘बी’ डिव्हिजन मॅचमध्ये स्फोटक फलंदाजी करत शतक झळकावले. 

नीलचे नाव आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत पाठविले होते. पण त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. विशेष म्हणजे नील मुंबईकडून कोणत्याही वयात खेळलेला नाही. त्याचे नाव नेहमी मुंबईच्या संभाव्य खेळाडूंच्या यादी होते. या स्फोटक खेळीनंतर बोलताना सांगितले, की या स्फोटक खेळीनंतरही मला संघात स्थान मिळेल की नाही याबाबत आशा नाही आहे. 

पोर्कोफीन क्रिकेटर्सकडून खेळणाऱ्या या डावखुऱ्या खेळाडूने रविवारी खार जिमखाना विरूद्ध ही खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौके आणि १२ षटकार लगावले. त्याने पहिले ५० धावा केवळ ११ चेंडूत केल्या. नार्वेकरच्या नावावर एका इनिंगमध्ये १० विकेट घेण्याचा रेकॉर्डही आहे. तो त्याने २००४ मध्ये शालेय सामन्यांमध्ये केला होता. गेल्या आठवड्यात त्याने हॅट्ट्रीक घेत पाच विकेट घेतल्या होत्या. 

या गतीने शतक बनविण्याचा मी विचार केला नव्हता. चेंडू बॅटवर येत होता. मला जलद धावा काढायच्या होत्या. जेव्हा मी ९६ धावांवर होतो, तेव्हा मला समजले की खेळ संपायला केवळ सात मिनिट बाकी आहे. तेव्हा मी षटकार लगावला आणि शतक झाले. यावेळी त्याचे आई-वडीलही मॅच पाहण्यासाठी मैदानावर होते. 

यावेळी जिमखाना टीमने ३४९ धावा केल्या. पण त्याला उत्तर देताना  पार्कोफीनकडून पृथ्वी शॉ (११०), पराग खानपूरकर (११०) आणि नार्वेकर (१०३) मदतीने नऊ विकेटवर ४९२ धावा ठोकल्या आणि पहिल्या इनिंगमधील आघाडीमुळे मॅचही खिशात टाकली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.