ब्रॅडमन यांच्या पहिल्या बॅटचा लिलावात

`जागतिक कीर्तीचा एक महान फलंदाज` अशी ओळख असलेले सर डॉन ब्रॅडमन यांची पहिल्या कसोटीतील पहिल्या बॅटचा लिलाव होणार आहे. १९२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटी सामान्यातील ब्रॅडमन यांच्यासमवेत १९ खेळांडूची स्वाक्षरी या बॅटवर आहे.

Updated: May 13, 2014, 06:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सिडनी
`जागतिक कीर्तीचा एक महान फलंदाज` अशी ओळख असलेले सर डॉन ब्रॅडमन यांची पहिल्या कसोटीतील पहिल्या बॅटचा लिलाव होणार आहे. १९२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटी सामान्यातील ब्रॅडमन यांच्यासमवेत १९ खेळांडूची स्वाक्षरी या बॅटवर आहे.
ब्रॅडमन यांची पहिली बॅट १ लाख ४५ हजार डॉलर इतक्या किंमतीत लिलाव होण्याची शक्यता संयोजकांनी वर्तवली आहे. ब्रॅडमन यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध झाला होता. याआधी २००८ मध्ये ब्रॅडमन यांनी शेवटच्या कसोटीत वापरलेल्या हिरव्या टोपीचा लिलावाची किंमत ४ लाख डॉलरपेक्षा जास्त होती.
१९३० मध्ये ब्रॅडमन यांची पहिली बॅट लहान मुलांच्या रुग्णालयासाठी सिडनी सन वर्तमानाला मदत म्हणून, देणगीच्या स्वरुपात देण्यात आली होती. सध्या ही बॅट नॅशनल स्पोर्टस संग्रहालय मेलबर्न इथे ठेवण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.