धक्कादायक : फिलिप ह्युजची बॅट चोरणारा कॅमेऱ्यात कैद

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला एक धक्का बसलाय... ह्युजचे निकटवर्तीय या धक्क्यातून अजून निटसे सावरलेही नाहीत एव्हानाच एक लाजिरवाणी घटना समोर आलीय. 

Updated: Dec 6, 2014, 09:19 PM IST
धक्कादायक : फिलिप ह्युजची बॅट चोरणारा कॅमेऱ्यात कैद title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला एक धक्का बसलाय... ह्युजचे निकटवर्तीय या धक्क्यातून अजून निटसे सावरलेही नाहीत एव्हानाच एक लाजिरवाणी घटना समोर आलीय. 

ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल '7 न्यूज'नं दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीनं प्रकाशझोतात येण्यासाठी असा काही कारनामा केलाय ज्याचा कधी कुणी विचारही केला नसेल.

नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओनुसार, या व्यक्तीनं चक्क फिलिप ह्युजला दिल्या गेलेल्या श्रद्धांजली देण्यासाठी ठेवण्यात आलेली त्याची बॅटच चोरलीय. ही बॅट चोरी करताना हा व्यक्ती स्पष्ट दिसतोय.

रस्त्यावरून जाताना या व्यक्तीची नजर या बॅटकडे वळली. त्यानंतर आपल्या आजुबाजुला कुणीही नाही याची खात्री केल्यानंतर या व्यक्तीनं सरळ बॅट उचलली आणि तिथून काढता पाय घेतली. 

या घटनेमुळे, ह्युजच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.