'प्लास्टिक बॅग बॉय'ची मेसीला भेटण्याची इच्छा

कोणत्याही क्षेत्रातला हिरो असला तरी त्याचा चाहताही त्याच तोडीचा असला, तर त्या हिरोकडून आणि अख्या जगाकडून त्याचं कौतुक होतं.

Updated: Feb 3, 2016, 09:02 AM IST
'प्लास्टिक बॅग बॉय'ची मेसीला भेटण्याची इच्छा title=

काबूल : कोणत्याही क्षेत्रातला हिरो असला तरी त्याचा चाहताही त्याच तोडीचा असला, तर त्या हिरोकडून आणि अख्या जगाकडून त्याचं कौतुक होतं.

फुटबॉलमधील स्टार खेळाडू लिओ मेसीचा असाच एक ५ वर्षाचा छोटा चाहता आहे. त्याला 'प्लास्टिक बॅग बॉय'ही म्हटलं जातंय.

मेसीचा हा किती चाहता आहे, हे एका फोटोवरून समोर आला. या चिमुकल्या मुर्तजा अहमदीने एक प्लास्टिक बॅग आणली आणि त्याच्या मोठ्या भावाला सांगितलं मला याची जर्सी बनवून दे.

 ती प्लास्टिक बॅग खाली फाडण्यात आली आणि अहमदीसाठी मोठा भाऊ ह्यमायूने जर्सी बनवली. नंतर हा फोटो खूप व्हायरल झाला.

तो लिओ मेसीपर्यंत पोहोचला, आधी हा मुलगा इराकचा असल्याचं म्हटलं जातं होतं, पण छोटा फॅन मुर्तजा अहमदीचा काका ऑस्ट्रेलियात आहे, त्याने सांगितलं की, हा माझा पुतण्या आहे. तो अफगाणिस्तानचा आहे.

मुर्तजा अहमदीला लिओ मेसी खूप आवडतो, मला एकेदिवशी त्याला भेटायचं आहे, त्याच्यासारखं खेळायचं आहे, असं त्याने म्हटलंय, त्याला प्लास्टिक बॅग बॉय म्हटलं गेल्याने, त्याला आता मेसी सारखी नवी जर्सी आणून देण्यात आली आहे.

अफगाण फुटबॉल असोसिएशनने या मुलाची भेट लिओ मेसीसोबत घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना अजून यश आलेलं नाही, मेसीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, तेव्हा अहमदी लवकरच मेसीला भेटण्यासाठी स्पेनला जाण्यार असल्याचं सांगण्यात येतंय.