क्रिकेट खेळाडूंच्या हॉटेलवर चिअरलीडर्स, बीसीसीआयची बंदी

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल सीजनच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स जल्लोष करताना दिसत होत्या. त्यांच्या कपड्यांवरुन वादळ उठल्यानंतर त्यांना पूर्ण कपडे परीधान करण्यास भाग पाडण्यात आले. आता तर त्यांना ज्या हॉटेलमध्ये खेळाडू असतील त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी बीसीसीआयने घातली आहे.

Updated: Apr 16, 2015, 03:04 PM IST
क्रिकेट खेळाडूंच्या हॉटेलवर चिअरलीडर्स,  बीसीसीआयची बंदी title=

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल सीजनच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स जल्लोष करताना दिसत होत्या. त्यांच्या कपड्यांवरुन वादळ उठल्यानंतर त्यांना पूर्ण कपडे परीधान करण्यास भाग पाडण्यात आले. आता तर त्यांना ज्या हॉटेलमध्ये खेळाडू असतील त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी बीसीसीआयने घातली आहे.

या बंदीमुळे चिअरलीडर्सना खेळाडूंनी बोलणे शक्य होणार नाही. बीसीसीआयने खेळाडूंच्या पार्टीवर याआधी बंदी घातली आहे. बीसीसीआयला कोणताही धोका पत्कारायचा नाही. त्यामुळे ही बंदी घालण्याचा निणर्य घेण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. बीसीसीआय यापुढे कोणताही वाद उद्धभवणार नाही, यासाठी खबरदारी घेत आहे, असे एका फ्रेंचायचीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

याआधी आयपीएल सीजनच्यावेळी चिअरलीडर्स खेळाडूंच्या हॉटेलवर थांबत होत्या. त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने ही खबरदारी घेण्यात आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.