प्रीती झिंटानं संजय बांगरला घातल्या शिव्या

आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटानं पंजाबचा कोच संजय बांगरला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे. 

Updated: May 12, 2016, 04:07 PM IST
प्रीती झिंटानं संजय बांगरला घातल्या शिव्या title=

मुंबई: आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटानं पंजाबचा कोच संजय बांगरला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे. तसंच बांगरला टीममधून काढायचीही धमकी दिली आहे. इंग्रजी वृत्तपत्र मुंबई मिररनं ही बातमी दिली आहे. 

यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाची कामगिरी वाईट झाली आहे. पॉईंट्स टेबलमध्येही पंजाब शेवटच्या क्रमांकावर आहे. बंगळुरूविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पंजाबचा एक रननं पराभव झाला, यामुळे प्रीती संजय बांगरवर भडकली. अक्षर पटेलआधी फरहानला बॅटिंगला पाठवल्यानं तिला संजय बांगरचा राग आला, आणि पराभवाचं खापर तिनं संजय बांगरवर फोडलं. 

दरम्यान प्रीती झिंटा आणि संजय बांगर यांनी असं काही झालेलं नसल्याचं म्हंटलं आहे. पण प्रीतीनं बांगरला अश्लील शिव्या दिल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं असल्याचं मुंबई मिररचं वृत्त आहे. 

याआधीच्या आयपीएलमध्येही प्रीती झिंटाबरोबर वाद झाले आहेत. मग ते नेस वाडियासोबत झालेलं भांडण असो किंवा युवराज सिंगला दिलेला किस असो, प्रीती नेहमीच चर्चेत राहिली आहे.