मोहालीत प्रिती झिंटाला केले लग्नासाठी प्रपोज

सोमवारी मोहालीत झालेल्या किंग्ज इलेवन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात एका प्रेक्षकाने प्रिती झिंटाला एका अनोख्या पद्धतीने प्रपोज केले. 

Updated: Apr 28, 2015, 04:04 PM IST
मोहालीत प्रिती झिंटाला केले लग्नासाठी प्रपोज title=

मोहाली : सोमवारी मोहालीत झालेल्या किंग्ज इलेवन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात एका प्रेक्षकाने प्रिती झिंटाला एका अनोख्या पद्धतीने प्रपोज केले. 

प्रक्षेकाने केलेल्या प्रपोजमुळे प्रिती झिंटा अक्षरशः लाजली. झालं असं की मॅच सुरू असताना प्रिती झिंटा मैदानाचा राऊंड मारत होती. त्यावेळी एका प्रेक्षकाने एक बॅनर हवेत झळकावला. त्यात प्रिती झिंटाचा फोटो होता. त्यावर लिहीले होते. प्रिती विल यू मॅरी मी....

प्रिती हे बॅनर पाहून हैराण झाली. आणि दुसऱ्या क्षणी ती लाजून गालात हसली. किंग्ज इलेवन या सामन्यात पराभूत झाली, पण प्रिती झिंटाने नेहमी प्रमाणे प्रेक्षकांना किंग्ज इलेवनचं टी-शर्ट द्यायला विसरली नाही. यावेळी कोणत्या तरी गोष्टीवरून ती नाराजही दिसली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.