हा व्हिडीओ हाशिम आमला विषयीचा राग दूर करतोय

दक्षिण आफ्रिका टीमचा तुम्हाला भलताच राग आला असेल, खेळाला आपण खिलाडी वृत्तीने स्वीकारू या, सामना सुरू असतांना विरूद्ध टीमचा राग तेवढा पुरता महत्वाचा, पण हा व्हिडीओ पाहिला तर दक्षिण आफ्रिका टीमविषयीचा तुमचा राग निश्चित दूर होईल. 

Updated: Feb 25, 2015, 01:45 PM IST
हा व्हिडीओ हाशिम आमला विषयीचा राग दूर करतोय title=

केपटाऊन : दक्षिण आफ्रिका टीमचा तुम्हाला भलताच राग आला असेल, खेळाला आपण खिलाडी वृत्तीने स्वीकारू या, सामना सुरू असतांना विरूद्ध टीमचा राग तेवढा पुरता महत्वाचा, पण हा व्हिडीओ पाहिला तर दक्षिण आफ्रिका टीमविषयीचा तुमचा राग निश्चित दूर होईल. 

एवढंच नाही तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, तुम्हाला वाटेल टीम इंडियानंतर जर कुणी वर्ल्डकप जिंकावा, तर फक्त दक्षिण आफ्रिकेच्या टीमने, आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीमने जे (व्हिडीओत दाखवलंय) केलंय, ते टीम इंडिया कधी करेल का? हा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.

केपटाऊनमधील एक अकरा वर्षाचा मुलगा दक्षिण आफ्रिका टीमचा भलताच फॅन होता , त्याला भेटायला अख्खी टीम घरी गेली, एवढंच नाहीतर त्या मुलासोबत आणि त्यांच्या मित्रांसोबत त्यांनी काय धमाल केली ते तुम्ही या व्हिडीओत पाहा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.