पंजाबला धोनीनं तुफान धुतलं

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याचा 4 विकेटनं शानदार विजय झाला आहे.

Updated: May 21, 2016, 07:51 PM IST
पंजाबला धोनीनं तुफान धुतलं title=

विशाखापट्टणम: किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याचा 4 विकेटनं शानदार विजय झाला आहे. पुण्याच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो कॅप्टन महेंद्रसिंग धोनी. शेवटच्या तीन बॉलमध्ये विजयासाठी 16 रनची आवश्यकता असताना धोनीनं पंजाबच्या अक्सर पटेलला फोर त्यानंतर सिक्स आणि पुन्हा सिक्स मारून पुण्याला जिंकवून दिलं. 

धोनीनं 32 बॉलमध्ये 64 रनची अफलातून खेळी केली, ज्यामुळे पुण्यानं 173 रनचं लक्ष पार केलं. 

या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 172 रन केल्या. पंजाबचा कॅप्टन मुरली विजयनं 59 रन केल्या.