बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू आणि कॅरोलिना मरिन आज आमनेसामने

रिओ ऑलिम्पिकमधील अखेरच्या सामन्यात भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मरिन एकमेकींविरुद्ध लढल्या होत्या. दुबई येथे सुरु असलेल्या जागतिक सुपर सीरिज फायनल स्पर्धेत आज या दोघी पुन्हा आमनेसामने येणार आहे. 

Updated: Dec 16, 2016, 10:37 AM IST
बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू आणि कॅरोलिना मरिन आज आमनेसामने title=

दुबई : रिओ ऑलिम्पिकमधील अखेरच्या सामन्यात भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मरिन एकमेकींविरुद्ध लढल्या होत्या. दुबई येथे सुरु असलेल्या जागतिक सुपर सीरिज फायनल स्पर्धेत आज या दोघी पुन्हा आमनेसामने येणार आहे. 

ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात कॅरोलिनाने सिंधूला हरवत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले होते. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी सिंधूकडे आहे. 

या स्पर्धेतील पहिला सामना सिंधूने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात तिला हार पत्करावी लागली. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सिंधूला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. दुसरीकडे कॅरोलिनासाठीही हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे.