आयसीसी क्रमवारीत अश्विनची घसरण

भारताचा गोलंदाज आर. अश्विनची आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत घसरण झालीये. अश्विन या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे तर रवींद्र जडेजा आठव्या स्थानी आहे. 

Updated: Sep 1, 2016, 08:34 AM IST
आयसीसी क्रमवारीत अश्विनची घसरण title=

दुबई : भारताचा गोलंदाज आर. अश्विनची आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत घसरण झालीये. अश्विन या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे तर रवींद्र जडेजा आठव्या स्थानी आहे. 

फलंदाजांच्या यादीत भारताचा मुंबईकर अजिंक्य रहाणे एकमेव फलंदाज  आहे. अजिंक्य या यादीत आठव्या स्थानी आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी आहे. 

आता रँकिंगमध्ये सुधारणा कऱण्यासाठी भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सना कमालीचे कष्ट करावे लागणार आहेत.