आयपीटीएलमध्ये नदाल-फेडरर आमनेसामने

टेनिसजगतातील दोन दिग्गज खेळाडू राफाएल नदाल आणि रॉजर फेडरर यांचा खेळ याचि देही याचि डोळा पाहण्याची नामी संधी दिल्लीकरांना मिळणार आहे. 

Updated: Dec 12, 2015, 10:05 AM IST
आयपीटीएलमध्ये नदाल-फेडरर आमनेसामने title=

नवी दिल्ली : टेनिसजगतातील दोन दिग्गज खेळाडू राफाएल नदाल आणि रॉजर फेडरर यांचा खेळ याचि देही याचि डोळा पाहण्याची नामी संधी दिल्लीकरांना मिळणार आहे. 

इंडियन प्रीमियर टेनिस लीगच्या माध्यमातून टेनिसप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणीच असणार आहे. आयपीटीएलच्या मुकाबल्यामध्ये फेडरर विरुद्ध नदाल ही बिग फाईट रंगणार आहे. 

यंदाच्या आयपीटीएलच्या लढतींचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर या दोघांच्या लढतीबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर तो क्षण आज याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळणार आहे. 

दरम्यान, या महामुकाबल्यात रॉजर आणि नदालपैकी कोण सरस ठरतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.