भारत-द.आफ्रिका सामन्यावर आजही पावसाचं सावट

शहरात पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने, आजही सामन्याला सुरूवात होऊ शकलेली नाही, मात्र दुपारच्या जेवणापूर्वी जर पाऊस थांबला, तर खेळाला सुरूवात होऊ शकते.

Updated: Nov 16, 2015, 10:11 AM IST
भारत-द.आफ्रिका सामन्यावर आजही पावसाचं सावट title=

बंगळुरू : शहरात पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने, आजही सामन्याला सुरूवात होऊ शकलेली नाही, मात्र दुपारच्या जेवणापूर्वी जर पाऊस थांबला, तर खेळाला सुरूवात होऊ शकते.

बंगळुरू शहरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, रविवारीही पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. या सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा होता, पण या कामगिरीवर पावसामुळे पाणी फिरणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याला काल प्रचंड गर्दी होती रविवार असल्याने प्रत्येकाने सामन्याचा आनंद घेण्याचा बेत आखला होता, मात्र पावसामुळे क्रिकेट फॅन्सची मोठी निराशा पाहण्यास मिळाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.