रांची टेस्ट अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश

रांचीमधली तिसरी टेस्ट अनिर्णित राखण्यामध्ये ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे.

Updated: Mar 20, 2017, 04:50 PM IST
रांची टेस्ट अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश

रांची : रांचीमधली तिसरी टेस्ट अनिर्णित राखण्यामध्ये ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे. पाचव्या दिवसाची सुरुवात २३/२ अशी करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं २०४/६ एवढी मजल मारली.

पहिल्याच सत्रामध्ये भारतीय बॉलर्सनी कांगारूंच्या दोन बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यावर मॅच जिंकायच्या आशा पल्लवीत झाल्या पण शॉन मार्श आणि पिटर हॅण्ड्सकॉम्बच्या अर्धशतकामुळे रांची टेस्ट जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं. पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट आणि अर्धशतक झळकावणारा रवींद्र जडेजानं या इनिंगमध्येही कांगारूंच्या ४ बॅट्समनना आऊट केलं. 

पुण्यातली पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकल्यानंतर भारतानं बंगळुरूमध्ये कमबॅक करत सीरिजमध्ये बरोबरी केली. आता तिसरी टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरतील. २५ मार्चपासून धर्मशाळामध्ये चौथ्या टेस्टला सुरुवात होईल.