रवींद्र जडेजाच्या 'त्या' कॅचने सामन्याचा निकाल फिरवला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवत मालिका खिशात घातली. भारताने हा सामना २७ धावांनी जिंकला खरा मात्र या रवींद्र जडेजाच्या त्या कॅचने सामन्याचा निकाल फिरवला.  पाहा संपूर्ण व्हिडीओ

Updated: Jan 30, 2016, 11:13 AM IST
रवींद्र जडेजाच्या 'त्या' कॅचने सामन्याचा निकाल फिरवला title=

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवत मालिका खिशात घातली. भारताने हा सामना २७ धावांनी जिंकला खरा मात्र या रवींद्र जडेजाच्या त्या कॅचने सामन्याचा निकाल फिरवला.  पाहा संपूर्ण व्हिडीओ

जडेजाने १५व्या षटकांत शेन वॉटसनचा जबरदस्त कॅच घेत सामन्याचे फासे पलटवले. धोनीनेही जडेजाने घेतलेल्या अप्रतिम कॅचचे कौतुक केले. जडेजाचा तो कॅच जबरदस्त होता. तो सामन्याचा टर्निंग पॉइंट होता, असे धोनी म्हणाला. 

खरतरं हा कॅच फार कठीण होता. कोणत्याही गोलंदाजाला आपल्याच बॉलवर कॅच घेणे सोपे नसते. त्यातच वॉटसनसारखा क्रिकेटर समोर असेल तर ते आणखी कठीण होते. वॉटसन नेहमी कोणताही शॉट जोर लावून खेळतो. त्यामुळे वॉटसनने मारलेला चेंडू चांगल्याच वेगात होता. यामुळे अंपायरनाही खाली वाकावे लागले. मात्र जडेजाने इतक्या चपळाईने कॅच घेतला की खुद्द वॉटसनही पाहत राहिला. त्याला या कॅचवर विश्वासच होत नव्हता.