अर्धशतकानंतर सर रवींद्र जडेजाची तलवारबाजी?

लॉर्डस टेस्टच्या दुसऱ्या डावात अर्ध शतक केल्यानंतर सर रवींद्र जडेजाने आनंदात आपली बॅट उंचावली. जडेजाच्या या स्टाईलला कोणीतरी तलवारबाजी म्हटलं, तर कोणीतरी काठी चालवण्याची स्टाईल असल्याचे सांगितले.

Updated: Jul 22, 2014, 04:41 PM IST
अर्धशतकानंतर सर रवींद्र जडेजाची तलवारबाजी? title=

लंडन : लॉर्डस टेस्टच्या दुसऱ्या डावात अर्ध शतक केल्यानंतर सर रवींद्र जडेजाने आनंदात आपली बॅट उंचावली. जडेजाच्या या स्टाईलला कोणीतरी तलवारबाजी म्हटलं, तर कोणीतरी काठी चालवण्याची स्टाईल असल्याचे सांगितले.

याबाबत खुद्द रवींद्र जडेजाने स्पष्टकरण दिले आहे. मी अशी बॅट का फिरवली हा प्रश्न मात्र सर्वांच्या मनात कायम होता, तेव्हा शेवटी जडेजाने या प्रश्नाचं उत्तर दिलं. या उत्रराने अनेकांची शंका दूर झाली आहे.

रवींद्र जडेजाने मुलाखतीत म्हटलं, ही राजपुतांची एक परंपरा आहे. सेलिब्रेशनमध्ये तलवारबाजी करण्याची ही फॅशन असल्याने आपण असं केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.