शोभा डेंना उपरती, मागितली माफी

 शोभा डे यांना उशिराचं शहाणपण सुचले आहे. आपली चूक मान्य करून शोभा डे यांनी पी व्ही सिंधू आणि साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Updated: Aug 19, 2016, 06:26 PM IST
शोभा डेंना उपरती, मागितली माफी title=

मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळा़डूंच्या कामगिरीविषयी आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या शोभा डे यांना उशिराचं शहाणपण सुचले आहे. आपली चूक मान्य करून शोभा डे यांनी पी व्ही सिंधू आणि साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर सिक्सर खेचलाय. कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला रियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या पदकाची कमाई करुन दिली. यावर सेहवागनं केलेलं ट्विट सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

विशेष म्हणजे सेहवागच्या या ट्विटवर अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करुन सेहवागचे कौतुक केले आहे. आणि त्यानंतरही ट्विटचा हा सिलसिला असाच सुरू राहिला. सेहवागनं अमिताभ यांच्या ट्विटवर जी प्रतिक्रिया दिलीय तिही तितकीच खट्याळ आणि मिश्किल आहे.