पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी रोहित कुमारला अटक

भारताचा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. 

Updated: Oct 21, 2016, 01:26 PM IST
पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी रोहित कुमारला अटक title=

नवी दिल्ली : भारताचा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. 

रोहितवर त्याची पत्नी ललिताने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केलाय. दरम्यान, रोहितने सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध करताना हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.

या व्हिडीओत रोहितने म्हटलंय की, मला मुद्दामहून या प्रकरणात गोवलं गेलंय. माझे माझ्या पत्नीवर प्रेम होते. तसेच मी कधीही तिचा छळ केला नाही. कधीच हुंडा मागितला नाही. न्यायासाठी मी नक्की लढेन.

काही महिन्यांपूर्वी रोहित आणि ललिताचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच तिने गळफास लावून घेत आत्महत्या केली. मृतदेहाजवळ आढलेल्या चिठ्ठीत ललिताने पती आणि त्याच्या कुटुंबियांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केलाय.