रोहीत ब‌ॅटिंगमधील 'मिस इंडिया', गंभीरची शाब्दीक खेळी

क्रिकेटर मैदानात ज्या प्रकारे फटके मारतात, त्याच प्रकारे मैदानाबाहेरही शाब्दीक फटके मारतांना दिसतात. कोलकाता नाईट रायडरचा कर्णधार गौतम गंभीरने रोहीत शर्माची प्रशंसा करत त्याला बॅटिंगमधील 'मिस इंडिया' आहे, असे सांगितले आहे.

Updated: Apr 12, 2015, 03:07 PM IST
रोहीत ब‌ॅटिंगमधील 'मिस इंडिया', गंभीरची शाब्दीक खेळी title=

मुंबई : क्रिकेटर मैदानात ज्या प्रकारे फटके मारतात, त्याच प्रकारे मैदानाबाहेरही शाब्दीक फटके मारतांना दिसतात. कोलकाता नाईट रायडरचा कर्णधार गौतम गंभीरनेही रोहीत शर्माची प्रशंसा करत त्याला बॅटिंगमधील 'मिस इंडिया' आहे, असे लिहिले आहे.

एका कॉलममध्ये गंभीरने लिहिले की, 'रोहितने उत्कृष्ट खेळ दाखवला. तो मैदानात खेळाडूंमधून असे गॅप शोधतो, जसे ट्रॅफिक मधून सहजरित्या रोल्स रॉयल चालवणे.'

एका लेखकाने वेस्ट इंडिजच्या कार्ल हूप्परची प्रशंसा करतांना लिहिले होते की, जर बॅटिंगची ब्यूटी कॉन्टेस्ट झाली असती तर हूप्पर मिल वर्ल्ड असते. त्या आधारावर मला वाटते रोहित सहज मिस इंडिया होऊ शकतो.' असे गंभीरने लिहिले आहे.

आयपीएलच्या पहिल्या कोलकाता नाईट रायडर विरूद्धच्या मॅचमध्ये रोहितने ६५ बॉलमध्ये ९८ रन्स केले होते. त्याबद्दन गंभीरने अशी प्रतिक्रिया दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.