कौतुक तुझ्या खेळाचं करावं की मादक सौंदर्याचं...!

कझाकिस्तानची 18 वर्षीय खेळाडू सबीना अलतिनबेकोवा सध्या खूप चर्चेत आहे. तसं पाहिलं तर सबीना एक व्हॉलीबॉल खेळाडू आहे. पण, सध्या सध्या चर्चा सुरू आहेत त्या सबीनाच्या व्हॉलीबॉलच्या नव्हेत तर तिच्या मादक सौंदर्याच्या.... 

Updated: Jul 29, 2014, 02:41 PM IST
कौतुक तुझ्या खेळाचं करावं की मादक सौंदर्याचं...! title=

नवी दिल्ली : कझाकिस्तानची 18 वर्षीय खेळाडू सबीना अलतिनबेकोवा सध्या खूप चर्चेत आहे. तसं पाहिलं तर सबीना एक व्हॉलीबॉल खेळाडू आहे. पण, सध्या सध्या चर्चा सुरू आहेत त्या सबीनाच्या व्हॉलीबॉलच्या नव्हेत तर तिच्या मादक सौंदर्याच्या.... 

सबीना कझाकिस्तानच्या अंडर – 19 व्हॉलीबॉल टीमची खेळाडू आहे. लहानपणापासूनच सबीनाला व्हॉलीबॉलचं वेड लागलंय. आत्तापर्यंत तिनं अनेक टूर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवलाय. सबीना जिथंही जाते तिथं तिच्या खेळापेक्षा सौंदर्यांच्याच चर्चा जास्त होतात. 


 

नुकतीच, ती अंडर – 19 व्हॉलीबॉल टूर्नामेंट खेळण्यासाठी तैवानची राजधानी तेपीला गेली होती. तेव्हा तिथं बसणाऱ्यांच्या नजरा सबीनावरून हलल्या नव्हत्या. ते एकटक सबीनालाच पाहत बसले होते.  

सबीनाच्या सौंदर्याच्या चर्चा इतक्या मोठ्या होत्या की या उमलत्या खेळाडूवर 10 कॉलमच्या बातम्या वर्तमानपत्रांत दिसू लागल्या. पण, त्यामुळे सबीनाच्या टीमचे इतर सदस्य आणि विरुद्ध टीम मेम्बर इतके नाराज झाले की त्यांनी तिच्याविषयी तक्रारी सुरू केल्या. 


 

या खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, लोकांना आता त्यांना किंवा मॅच पाहायची नाहीए यामुळे, यासाठी कारणीभूत असणाऱ्या या मुलीला मॅचबाहेर केलं जायला हवं. 

परंतु, सबीना मात्र या प्रतिक्रियेमुळे नाराज झाली नाही. सबीना म्हणते, ‘माझे फॅन्स माझ्यावर प्रेम करतात ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे... व्हॉलीबॉल खेळणं हे माझं प्रेम आहे, जे मी सोडून देऊ शकत नाही’ 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.