सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक्सची चांगलीच चलती आहे. मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, नीरजा, अझर आणि एम.एस.धोनी या सिनेमांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडलीय.

Updated: Apr 12, 2016, 08:16 AM IST
सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक्सची चांगलीच चलती आहे. मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, नीरजा, अझर आणि एम.एस.धोनी या सिनेमांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडलीय.

भारतरत्न सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. क्रिकेटच्या देवाच्या जीवनावर बनणा-या सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलंय. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिननं या सिनेमाचं पोस्टर ट्विटरवर लॉन्च केलंय. या सिनेमाचा टीझर १४ एप्रिलला प्रदर्शित होणार असून इंग्लडमधील प्रसिध्द दिग्दर्शक जेम्स एरेक्सन याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 

धोनीच्या जीवनावर बनणा-या सिनेमात धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूत तर अझरच्या जीवनावरील सिनेमात इमरान हाशमी अझरची भूमिका साकारतोय. त्यामुळं सचिनच्या जीवनावर बनणा-या सिनेमात मास्टर ब्लास्टरची भूमिका कोण साकारणार याकडं नजरा लागल्यात.