रिचर्ड्सन यांची सचिन तेंडुलकर,शेन वॉर्नने घेतली भेट

सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांनी आयसीसीचे मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेतली. तसेच प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा केली. 

Updated: Jun 4, 2015, 08:19 PM IST
रिचर्ड्सन यांची सचिन तेंडुलकर,शेन वॉर्नने घेतली भेट title=

दुबई : सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांनी आयसीसीचे मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेतली. तसेच प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा केली. 

भेटीत स्पर्धेचे स्वरुप कसे असेल या विषयी देखील त्यांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा अमेरिकेत घेण्यात येणार आहे.

आयसीसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार सचिन आणि वॉर्न यांनी आयसीसीच्या मुख्यालयाला भेट दिली. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी रिचर्डसन यांची भेट घेतली. यात स्पर्धेच्या ब्लू प्रिंटवर चर्चा झाली.

 मात्र ही स्पर्धा काही व्यक्तींकडून आयोजित केली जात आहे. त्यामुळे अशा स्पर्धेला मंजुरी देण्याचा अधिकार आयसीसीला नाही. स्थानिक क्रिकेट मंडळाच्या आखत्यारीतील ही बाब आहे. 
आयसीसीच्या नियमानुसार स्थानिक क्रिकेट मंडळ अशा स्पर्धांना मान्यता देते आणि त्याची माहिती संघटनेला कळविते. 

इंडियन प्रिमियर लीग, सीपीएल, नेटवेस्ट टी-२० या स्पर्धांना अनुक्रमे बीसीसीआय, ईसीबी आणि वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाने मंजुरी दिली होती. त्यामुळे या स्पर्धांना मान्यता देण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.