...जेव्हा सानियाला चेहरा झाकून पडावं लागतं बाहेर!

Updated: Jul 30, 2014, 05:31 PM IST
...जेव्हा सानियाला चेहरा झाकून पडावं लागतं बाहेर! title=

 

हैदराबाद :  सानिया मिर्झानं टेनिस खेळून जरी देशाचं नाव उंचावल असलं तरी रात्री बाहेर पडताना तिला आपला चेहरा झाकून बाहेर पडण्याची गरज भासतेय.

सानियानं फेसबुकवर आपला एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत तिनं स्वतःचा चेहरा मोठ्या नजाकतीनं झाकलेला दिसतोय.... या फोटोसोबत आपला चेहरा का लपवून ठेवावा लागतोय, याचं कारणंही सानियानं तिच्या फॅन्सना सांगितलंय. 

त्याचं झालं असं, खाण्याची शौकीन सानिया रात्रीच्या वेळेस हैदराबादच्या चारमिनार भागातील रस्त्यावरच्या दुकानांनवर चवदार पदार्थाची चव घेण्यासाठी बाहेर पडली होती. पण, यासाठी तिला चक्क वेश बदलावा लागला... आणि यासाठी तिला आपला चेहराही इतरांना दिसणार नाही, याची काळजी घ्यावी लागली. 

या फोटोसोबतच सानियानं तिचा आणखी एक फोटो पोस्ट केलाय. या दुसऱ्या फोटोत सानिया ‘ग्लाचसगो कॉमनवेल्थ’मध्ये सुरु असलेल्या एका मॅचची मज्जा घेताना दिसतेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.