मायामी ओपनमध्ये सानिया-मार्टिना जोडी वुमन्स डबल्स चॅम्पियन

सानिया मिर्झा आणि तिची डबल्सची पार्टनर मार्टिना हिंगीज जोडीने रशियाच्या एकतरिना मॅकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना जोडीचा 7-5, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत, मायामी ओपन वुमन्स डबल्स चॅम्पियनशीपवर नाव कोरलं. 

PTI | Updated: Apr 6, 2015, 09:21 AM IST
मायामी ओपनमध्ये सानिया-मार्टिना जोडी वुमन्स डबल्स चॅम्पियन title=

मियामी: सानिया मिर्झा आणि तिची डबल्सची पार्टनर मार्टिना हिंगीज जोडीने रशियाच्या एकतरिना मॅकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना जोडीचा 7-5, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत, मायामी ओपन वुमन्स डबल्स चॅम्पियनशीपवर नाव कोरलं. 

सानिया-मार्टिना जोडीचा हे सलग दुसरं जेतेपद ठरलं. याआधी गेल्या महिन्यात भारतीय-स्विस जोडीनं इंडियन वेल्सचं जेतेपद पटकावलं होतं. सानिया-हिंगीज जोडीने गेल्या 12 पैकी 11 मॅचेस जिंकण्याही पराक्रम केला आहे. 

मायामी ओपननंतर सानिया-मार्टिना जोडीसमोर आव्हान असणार आहे ते डब्ल्यूटीए टूर्नामेंटचं. मायामी ओपनच्या जेतेपदासह सानिया आतापर्यंतच्या वैयक्तिक सर्वोच्च तिस-या स्थानी पोहोचली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.