सौरव गांगुली टीम इंडियाचा डायरेक्टर की कोच?

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला भारतीय टीमचा डायरेक्टर बनवलं जावू शकतं. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरवला भारतीय टीमसोबत बांग्लादेशला पाठवलं जाणार आहे. मात्र सौरवला टीमचा प्रशिक्षक बनायचं आहे. 

Updated: May 24, 2015, 12:53 PM IST
सौरव गांगुली टीम इंडियाचा डायरेक्टर की कोच? title=

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला भारतीय टीमचा डायरेक्टर बनवलं जावू शकतं. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरवला भारतीय टीमसोबत बांग्लादेशला पाठवलं जाणार आहे. मात्र सौरवला टीमचा प्रशिक्षक बनायचं आहे. 

सध्या रवी शास्त्री भारतीय टीमचे कोच आहेत. भारत आणि बांगलादेश टेस्ट मॅच १० जुनपासून सुरू होणार आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमियांची सौरवनं भारतीय टीमचा कोच ऐवजी डायरेक्टर बनावं अशी इच्छा आहे. तसंच बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर रवी शास्त्रींना डायरेक्टर पदावर ठेवण्यास उत्सुक नाहीत, अशीही माहिती आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.