तर पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावेळी झाली असती गांगुलीची हत्या

1996 सालच्या इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात सौरव गांगुलीनं लॉर्ड्स आणि ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत भारतीय टीममध्ये स्थान पक्कं केलं.

Updated: Dec 30, 2016, 10:14 PM IST
तर पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावेळी झाली असती गांगुलीची हत्या  title=

कोलकाता : 1996 सालच्या इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात सौरव गांगुलीनं लॉर्ड्स आणि ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत भारतीय टीममध्ये स्थान पक्कं केलं. पण सौरव गांगुलीचा हाच दौरा शेवटचा ठरला असता. या इंग्लंड दौऱ्यामध्ये अंडर ग्राऊंड ट्यूबमधून प्रवास करत असताना काही मुलांनी सौरव गांगुली आणि नवजोत सिंग सिद्धूला बंदुकीचा धाक दाखवून रोखून धरलं होतं.

बिफीस क्रिकेट टेल्स या पुस्तकातल्या ट्रबल्स इन इंग्लंड या भागामध्ये खुद्द सौरव गांगुलीनंच हा किस्सा सांगितला आहे. लंडनच्या अंडर ग्राऊंड ट्यूबमधून जाताना आमच्या बाजुला दोन मुलं आणि तीन मुली होत्या. हे पाचही जण दारू पित होते. तेव्हा इकडून निघून जाण्यासाठी मी सिद्धूला सांगितलं. हे सगळं त्या मुलांनी ऐकलं आणि ते आमच्या अंगावर धावून आल्याचं दादा म्हणाला आहे.

हा वाद वाढत गेला आणि यातल्या एका मुलानं माझ्या चेहऱ्यासमोर बंदूक ठेवली, पण यातल्या एका मुलीनं त्याला रोखलं आणि घेऊन गेली. त्या मुलीनं हस्तक्षेप केला नसता तर याच दौऱ्यात माझी हत्या झाली असती, असं दादानं या पुस्तकात सांगितलं आहे.