गेलनंतर व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींग, ६६ बॉलमध्ये दीडशतक

वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकादा क्रिकेट मैदानात रन्सचा पाऊस पाडला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींगने. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये १६२ रन्स ठोकल्यात.

Updated: Feb 27, 2015, 01:22 PM IST
गेलनंतर व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींग, ६६ बॉलमध्ये दीडशतक title=

सिडनी : वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकादा क्रिकेट मैदानात रन्सचा पाऊस पाडला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींगने. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये १६२ रन्स ठोकल्यात.

व्हिलिअर्सने केलेली बेधडक बॅटींगने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलची आठवण झाली. गेलने वर्ल्डकपमध्ये रेकॉर्ड करत द्विशतक ठोकले. गेलप्रमाणे व्हिलिअर्सचे वादळ दिसून आले. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये वेस्ट इंडिजच्या बॉलरच्या चिंधड्या उडवल्या आणि संघाला ४०० रन्सचा डप्पा पार करुन दिला. व्हिलिअर्स १६१ रन्समध्ये १७ फोर आणि ८ खणखणीत सिक्स मारलेत.

आमला, प्लेसी, रोसॉ यांच्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध ५० ओव्हरमध्ये ५ बाद ४०८ रन्सचा डोंगर उभा केला. विंडीजपुढे ४०९ रन्सचे टार्गेट आहे. आता ख्रिस गेलची वादळी फलंदाजी कितपत प्रत्युत्तर देते याची उत्सुकता शिगेलाआहे.

आमला, प्लेसी यांनी मैदानावर टिकून सावध सुरुवात करीत आमला (८८ बॉलमध्ये ६५ रन्स) आणि डू प्लेसी (७० बॉलमध्ये ६२ रन्स) यांनी डावाची पायाभरणी केली. या दोघांचेही बळी ख्रिस गेलनेच टिपले. त्यानंतर आलेल्या रॉसॉने केवळ ३९ बॉलमध्ये ६१ धावा ठोकल्या.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हाशीम आमला आणि डिकॉक यांची जो़डी दक्षिण आफ्रिकेने सलामीला आलेत. आयर्लंडकडून मार खाल्यानंतर पाकिस्तान आणि झिंबाब्वेवर मात करीत वेस्ट इंडीजने आपले विश्वकरंडक स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.