भारताचा दौरा आव्हानात्मक - स्टीव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 3-0 असे यश मिळवल्यानंतर आगामी भारताचा दौरा सोपा नसणार असल्याचे त्याने म्हटलेय. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येतोय.

Updated: Jan 8, 2017, 09:42 AM IST
भारताचा दौरा आव्हानात्मक - स्टीव्ह स्मिथ title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 3-0 असे यश मिळवल्यानंतर आगामी भारताचा दौरा सोपा नसणार असल्याचे त्याने म्हटलेय. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येतोय.

ऑस्ट्रेलियाने 2004नंतर भारतात एकटी टेस्ट मॅच जिंकलेली नाहीये. यादरम्यानच्या सातही मॅचेसमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. 2013मध्ये ऑस्ट्रेलियाने भारत दौरा केला होता. यावेऴी पाहुण्यांना सीरिजमधील चारही मॅचमध्ये पराभवाचा धक्का बसला होता. 

त्यामुळे आगामी भारत दौरा आव्हानात्मक असल्याचे स्मिथला वाटतेय. भारताविरुद्धची सीरिज आव्हानात्मक आणि कठीण असेल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ढिसाळपणा चालणार नाही. सर्वच स्तरावर अव्वल कामगिरी करावी लागले. भारत दौरा आमच्यासाठी खरी परीक्षा असेल. या दौऱ्यात आमच्या क्रिकेटपटूंना बरेच काही शिकण्यास मिळेल, असे स्मिथ म्हणाला.