सिडनीचं मैदान टीम इंडियासाठी अनलकी!

वर्ल्डकप २०१५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये भारताचा ९५ रन्सनं पराभव झालाय... आजवरचा इतिहास पाहिला तर, सिडनीच्या ज्या मैदानावर टीम इंडियाचा पराभव झालाय त्या मैदानावर विजय मिळवणं टीम इंडियासाठी महाकठिण काम ठरलेलं दिसतंय.

Updated: Mar 26, 2015, 05:57 PM IST
सिडनीचं मैदान टीम इंडियासाठी अनलकी! title=

सिडनी : वर्ल्डकप २०१५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये भारताचा ९५ रन्सनं पराभव झालाय... आजवरचा इतिहास पाहिला तर, सिडनीच्या ज्या मैदानावर टीम इंडियाचा पराभव झालाय त्या मैदानावर विजय मिळवणं टीम इंडियासाठी महाकठिण काम ठरलेलं दिसतंय.

सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी)वर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज झालेली लढत १४ वी लढत होती... आणि आजवर भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करणं केवळ एकदाच शक्य झालंय. एससीजी मैदानावर टीम इंडियाचा आजचा तेरावा पराभव ठरलाय.

भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या ट्राय सीरिजच्या पहिल्या फायनलमध्ये विजय मिळवला होता. 

उल्लेखनीय बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कांगारुंना हरवणं टीम इंडियाला केवळ १० वेळा शक्य झालंय... तर तब्बल ३० मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलाय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.