...तर टीम इंडिया बनणार नंबर 1

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. पण आता टी-20 सीरिजमध्ये धोनीच्या शिलेदारांना कांगारुंचा बदला घ्यायची चांगली संधी आहे. 26 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या सीरिजमध्ये सगळ्या मॅच जिंकल्या तर टीम इंडिया टी-20 च्या रँकिंगमध्ये नंबर एकवर जाईल.

Updated: Jan 23, 2016, 07:49 PM IST
...तर टीम इंडिया बनणार नंबर 1 title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. पण आता टी-20 सीरिजमध्ये धोनीच्या शिलेदारांना कांगारुंचा बदला घ्यायची चांगली संधी आहे. 26 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या सीरिजमध्ये सगळ्या मॅच जिंकल्या तर टीम इंडिया टी-20 च्या रँकिंगमध्ये नंबर एकवर जाईल.

टीम इंडिया कशी होणार नंबर 1

टी-20मध्ये आत्ता टीम इंडियाकडे 110 पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही मॅच जिंकण्यात यश आलं तर हेच पॉईंट 120 वर जातील आणि टीम इंडिया नंबर 1 होईल. तर ऑस्ट्रेलियाचे 118 ऐवजी 110 पॉईंट्स होतील आणि ते आठव्या क्रमांकावर जातील. 

टीम इंडिया ही सीरिज 2-1 नं जिंकली तर ऑस्ट्रेलिया सहाव्या नंबरवर जाईल, तर धोनीच्या टीमला सातव्या क्रमांकावर समाधान मानाव लागेल. आत्ताच्या रँकिंगमध्ये टीम इंडिया आठव्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे सारखेच 118  पॉईंट्स आहेत. पण काही अंशांनी वेस्ट इंडिजची टीम पुढे असल्यानं ते नंबर एकवर आहेत. 

कोहलीलाही नंबर १ होण्याची संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये विराट कोहलीलाही नंबर 1 वर जाण्याची संधी आहे. सध्या विराट कोहली या रँकिंगमध्ये 845 पॉईंट्ससह दुस-या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच एक नंबरवर आहे. बॉलर्सच्या यादीमध्ये आर.अश्विन 681 पॉईंट्ससह 2 नंबरवर आहे. वेस्ट इंडिजचा सैम्युअल बद्री तब्बल 751 पॉईंट्ससह नंबर 1 वर कायम आहे.