टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेचे शानदार रेकॉर्डस

भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

Updated: Jun 24, 2016, 04:44 PM IST
टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेचे शानदार रेकॉर्डस title=

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुढील एक वर्षासाठी अनिल कुंबळे मुख्य प्रशिक्षकपदावर राहणार आहे. या पदासाठी ५७ जणांनी आवेदन केले होते. यातील कुंबळेची प्रशिक्षकपदासाठी निवड करण्यात आली. या माजी क्रिकेटपटूचे क्रिकेटच्या मैदानावरील विक्रमही मोठे आहेत. 

टेस्ट क्रिकेटमध्ये परफेक्ट टेन

अनिल कुंबळेने १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना एकट्याने संपूर्ण टीमला पॅव्हेलियनमध्ये धाडलं होतं. १० विकेट घेत त्याने नवा रेकॉर्ड रचला होता.

सहा वेळा पाचहून अधिक विेकेट

कुंबळेने २००४मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सहा वेळा पाचहून अधिक विकेट घेण्याची किमया साधलीये. २००४या वर्षात त्याने ७४ विकेट घेतल्या होत्या.

५०० विकेटसह शतक बनवणारा एकमेव क्रिकेटपटू

कुंबळे कसोटी क्रिकेटमध्ये ५००हून अधिक विकेट त्याचबरोबर कसोटीत शतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू आहे. 

१२ धावांत सहा विकेट

हीरो कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना कुंबळेने १२ धावांत ६ विकेट मिळवले होते. वनडेतील हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन.

आयपीएलमध्येही कुंबळेची जादू

इंडियन प्रीमियर लीगमध्ये कुंबळेच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. बंगळूरुकडून खेळताना ३.१ ओव्हरमध्ये फक्त ५ धावा देऊन त्याने राजस्थान रॉयल्सच्या ५ फलंदाजांना बाद केले होते. 

सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसरा

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुंबळे तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ६१९ विकेट घेतल्या.